कृषी उत्पन्न बाजार समिती, नांदगाव, नाशिक

msamblogo

शेतमाल

कमाल भाव

सर्वसाधारण भाव (रु.प्रती क्वि.)

कांदा (उन्हाळ)

१४५०

१२५०

मका

२२१५

२१५०

बाजरी

२६११

२१५०

गहू

२५७५

२५५०

ज्वारी

३३७१

२५५०

मठ

८३९९

८३९९

हरभरा

५०४०

५०४०

तूर

६०२१

६०२१

उडीद

७०००

७०००

तिळ

६१००

६१००

भूईमुंग शेंगा

५०५१

५०५०

सोयाबीन

२७३०

२७३०

कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगांव

 

कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगांव जि.नाशिक या बाजार समितीची स्थापना महाराष्ट्र राज्य राजपत्र दिनांक 2-9-1948 भाग ब मध्ये 773 या पानावर नोटीफिकेशन नंबर 7467-45 अ मध्ये प्रसिद्ध झाले आहे. प्रत्यक्ष कामास सुरुवात दिनांक 1/11/1948 पासून झाले आहे.

नांदगांव कृषी उत्पन्न बाजार समिती विभाजन

 

नांदगांव बाजार समितीचे दिनांक 18/7/1985 रोजी विभाजन होवून मनमाड बाजार समिती अस्तित्वात आली. नांदगांव तालुक्यातील त्यावेळेच्या 93 गावांपैकी 67 गावांचा समावेश नांदगांव बाजार समितीचे कार्यक्षेत्रात झालेला आहे. सदर कार्यक्षेत्राची विभागणी दिनांक 18/07/1985 पासून महाराष्ट्र शासन राजपत्र पान नं. 885 या पाना मध्ये प्रसिद्ध झाले आहे. नांदगांव बाजार समितीचे नांदगांव हे मुख्य बाजार आवार असुन १) बोलठाण २) न्यायडोंगरी ही दोन उपबाजार आवार आहेत. तिनही गावांना आठवडे बाजार भरतात.

नांदगांव कृषी उत्पन्न बाजार समिती चे दोन उपबाजार आवार

 

नांदगांव बाजार समितीचे मुख्य यार्ड नांदगांवसह

१) बोलठाण उपबाजार - सदर यार्डची शासन अधिसुचना दि. 16/06/1960. बोलठाण उपबाजारावर स्वमालिकीची 2.00 हेक्टर जमिन आहे. सदर यार्डवर शेतमाल लिलावाचे कामकाज चालते. यात प्रामुख्याने कांदा शेतमालाचा लिलाव होतो. त्यानंतर मका व इतर धान्य , कडधान्य यांचाही लिलाव होतो.

२) न्यायडोंगरी उपबाजार - सदर यार्डची शासन अधिसुचना दि. 03/12/1980. न्यायडोंगरी उपबाजारावर स्वमालिकीची 1 हेक्टर 30 आर. जमिन आहे. सदर यार्डवर शेतमाल लिलावाचे कामकाज चालते. यात प्रामुख्याने फक्त मका शेतमालाचा लिलाव होतो.

सन्माननिय पदाधिकारी

  • मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस

    मुख्यमंत्री

  • मा.ना. श्री. एकनाथ शिंदे

    उपमुख्यमंत्री

  • मा.ना.श्री. अजित पवार

    उपमुंख्यमंत्री

  • मा. ना. श्री. जयकुमार रावल

    पणन मंत्री , महाराष्ट्र राज्य

  • मा. श्री. विकास रसाळ

    पणन संचालक , महाराष्ट्र राज्य पुणे

  • मा.श्री. संजय कदम

    कार्यकारी संचालक , महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे

  • मा.श्री.फयाज मुलाणी

    जिल्हा उपनिबंधक , सह.संस्था , नाशिक

  • मा.श्री.दर्शन अनिलकुमार आहेर

    सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नांदगाव

  • मा.श्री.अनिल साहेबराव सोनवणे

    उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगांव